दहा लाखांचे दागिने परत करणारा प्रामाणिक अमीन शेख!

महाराष्ट्र वाणी न्युज
गरिबीतही प्रामाणिकपणा जपणारा एक प्रेरणादायी किस्सा
शहादा, ११जून :- आपल्या देशात अजूनही प्रामाणिकतेचा दीप तेवतो, हे दाखवणारी एक घटना नुकतीच शहादा येथे घडली. गरीब नवाज कॉलनीत राहणारे अमीन शेख हे दररोज विकास हायस्कूल परिसरात भंगार आणि रद्दी गोळा करण्याचे काम करतात.
९ जून रोजी विकास हायस्कूलजवळील राजपूत सर यांनी त्यांच्या घरातील काही जुनी रद्दी आणि भंगार अमीन शेख यांना दिली. मात्र त्या रद्दीत चुकून अंदाजे १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने देखील निघाले.
हे लक्षात येताच अमीन शेख यांनी कोणताही विचार न करता ती दागिने राजपूत सरांकडे परत केली. अत्यंत गरीब आर्थिक परिस्थितीत असतानाही त्यांनी प्रामाणिकपणा आणि सद्भावनेचा आदर्श उभा केला आहे.
अमीन शेख यांचं हे कृत्य केवळ दखलपात्र नाही तर प्रेरणादायी आहे.
आजच्या काळात अमीन शेखसारखे प्रामाणिक व्यक्ती हेच खरे हिरो!
समाजासाठी एक सकारात्मक संदेश देणारी ही घटना सर्वांनी जाणून घ्यावी, शेअर करावी.
🙏 धन्यवाद, अमीन शेख! तुमच्यासारख्या माणसांमुळेच समाज अजूनही माणुसकीवर विश्वास ठेवतो.