शेख शफीक राष्ट्रवादी (शरद पवार) चे नवे जिल्हा प्रवक्ते! सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवशी पक्षाकडून मोठी घोषणा

शेख शफीक राष्ट्रवादी (शरद पवार) चे नवे जिल्हा प्रवक्ते! सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवशी पक्षाकडून मोठी घोषणा

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), १जुलै :– राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या जिल्हा प्रवक्ते पदी शेख शफीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा ३० जून रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. या वेळी प्राचार्य सलीम शेख (प्रदेश सरचिटणीस), राजेश पवार (प्रदेश सरचिटणीस), आशिष पवार (शहर कार्याध्यक्ष) आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवडीबद्दल माजी आमदार व जिल्हा निरीक्षक चंद्रकांत दानवे, प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी आणि सुधाकर दानवे यांनी शेख शफीक यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 नवीन जबाबदारी, नव्या आशा – जिल्ह्यातील राजकारणात शेख शफीक यांची भूमिका ठळकपणे जाणवणार!