भराडीतील शिक्षकांशी हरिदास पाटील शेलार यांचा संवाद; डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयासाठी एकमताने मतदानाचे आवाहन

अब्दुल सत्तार यांचा शिक्षकांशी फोनद्वारे संपर्क; डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना पाठिंबा देण्याचे आवाहन

भराडीतील शिक्षकांशी हरिदास पाटील शेलार यांचा संवाद; डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयासाठी एकमताने मतदानाचे आवाहन
भराडीतील शिक्षकांशी हरिदास पाटील शेलार यांचा संवाद; डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयासाठी एकमताने मतदानाचे आवाहन

भराडी (ता. सिल्लोड) दि २२ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष हरिदास पाटील शेलार यांनी भराडी येथील सरस्वती भुवन प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना शंभर टक्के मतदान होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या संवादादरम्यान सिल्लोड तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी फोनद्वारे शिक्षकांशी संपर्क साधला. त्यांनी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना एकमताने मतदान करण्याचे आवाहन केले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष हरिदास पाटील शेलार, भराडीचे सरपंच पप्पू जगनाडे, सिल्लोड-सोयगाव विधानसभा अध्यक्ष उबेद बापू देशमुख, डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे प्रतिनिधी गिरीश दूत यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शिक्षकांशी साधलेल्या या संवादातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराला पाठिंबा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित