दुष्काळ, बेरोजगारी अन् शिक्षणाच्या प्रश्नांसाठी संघर्षाची नवी सुरुवात; डॉ. प्रतापसिंह पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ

दुष्काळ, बेरोजगारी अन् शिक्षणाच्या प्रश्नांसाठी संघर्षाची नवी सुरुवात; डॉ. प्रतापसिंह पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ५ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे उद्या अत्यंत साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कुठलाही गाजावाजा किंवा शक्तिप्रदर्शन न करता अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यात सध्या दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आंदोलन, पेपरफुटी, बेरोजगारी, शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न गंभीर बनले आहेत. या पार्श्वभूमीवर आपली उमेदवारी ही केवळ निवडणूक लढविण्यासाठी नसून पदवीधर, विद्यार्थी, युवक, शिक्षक, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची नवी सुरुवात असल्याचे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.

“लवकरच मी आपल्या प्रत्येकाच्या भेटीला येणार आहे. आपले प्रश्न ऐकणार, आपली भूमिका समजून घेणार आणि आपल्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवत राहणार,” असे डॉ. पाटील यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

पदवीधरांच्या हक्कांसह शिक्षण, रोजगार आणि अन्यायाविरुद्धच्या प्रश्नांना आपल्या राजकीय भूमिकेच्या केंद्रस्थानी ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“आपला विश्वास, आशीर्वाद आणि साथ हीच माझी खरी ताकद आहे,” असे आवाहन डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी केले आहे.

डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील

उमेदवार – मराठवाडा पदवीधर मतदारसंघ

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार

महाविकास आघाडी

अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज