"स्टॅम्प पेपरशिवाय शपथपत्र वैध! महसूलमंत्र्यांचा मोठा निर्णय"

"स्टॅम्प पेपरशिवाय शपथपत्र वैध! महसूलमंत्र्यांचा मोठा निर्णय"

महाराष्ट्र वाणी न्युज 

नागपूर दि८ जून :- शासकीय ई-सेवा केंद्रांमधून शैक्षणिक दाखले किंवा न्यायालयात सादर होणाऱ्या शपथपत्रांसाठी शंभर वा पाचशे रुपयांचे स्टॅम्प पेपर मागणे हे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना ठोस इशारा दिला आहे. त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना याबाबत अधिकृत पत्र पाठवून पुढील कार्यवाहीत काळजी घेण्यास सांगितले आहे.

बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, जात पडताळणी, उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमिलेयर, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि विविध न्यायालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपर वापरण्याची आवश्यकता आता उरलेली नाही. शासनाने दोन महिन्यांपूर्वीच यासंदर्भात निर्णय घेतला असून, नागरिकांनी किंवा अधिकाऱ्यांनी स्टॅम्प पेपरची मागणी करणे आता अनुचित आहे.

ते पुढे म्हणाले की, शासकीय कार्यालये आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली प्रतिज्ञापत्रे आता फक्त साध्या कागदावर स्वयं-साक्षांकित स्वरूपात स्वीकारली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक खर्च आणि वेळ वाचवावा, तसेच अधिकाऱ्यांनी नव्या नियमांचे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

आता शपथपत्रासाठी साधा कागद पुरेसा!

बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना