राहुल गांधींच्या नेतृत्वाचा उज्वल आढावा — 'शिदोरी' विशेषांकाचे प्रकाशन

राहुल गांधींच्या नेतृत्वाचा उज्वल आढावा — 'शिदोरी' विशेषांकाचे प्रकाशन
राहुल गांधींच्या नेतृत्वाचा उज्वल आढावा — 'शिदोरी' विशेषांकाचे प्रकाशन

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई १९ जून (प्रतीनीधी) :- लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे सर्वमान्य नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मुखपत्र 'शिदोरी' च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या विशेषांकाच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या कार्याची आणि जनआकांक्षांना साद घालणाऱ्या नेतृत्वाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली.

या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उपाध्यक्ष (प्रशासन) गणेश पाटील, शिदोरी मासिकाचे प्रबंधक संपादक आणि प्रदेश सरचिटणीस अनंत बाबूजीदादा मोहोड, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'शिदोरी' चा विशेषांक प्रकाशित करण्यात आला.

कार्यक्रमात गजानन देसाई, राजन भोसले, मुनाफ हकीम, राघवेंद्र शुक्ल, सुभाष पाखरे, रमेश शेट्टी यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विशेषांकाच्या माध्यमातून राहुल गांधींच्या सामाजिक, राजकीय व लोककल्याणकारी कार्याचा परामर्श घेण्यात आला असून तो जनतेसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे.