‘ही जागा आमचीच… आम्हीच लढवणार!’ म्हणणारे नेते आता एकाच मंचावर!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ५ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये उमेदवारीवरून काही दिवसांपासून जोरदार राजकीय रस्सीखेच पाहायला मिळत होती.
‘ही जागा आमचीच आहे… आम्हीच लढवणार’, अशी ठाम भूमिका घेणारे महायुतीतील नेते एकमेकांविरोधात भूमिका मांडताना दिसले.
मात्र, राजकारणात समीकरणे कधी बदलतील याचा नेम नाही!
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना याच महायुतीतील प्रमुख नेते एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे—
‘कालपर्यंत विरोध… मग आज एकत्र कसे?’
काही दिवसांपूर्वी उमेदवारीवरून विरोध… आणि आज अर्ज दाखल करताना एकजुटीचा संदेश!
त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे—
‘कालपर्यंत विरोध… मग आज एकत्र कसे?’
निवडणुकीच्या मैदानात महायुतीची ही एकजूट किती टिकते आणि मतदार या बदललेल्या राजकीय भूमिकेकडे कसे पाहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र वाणी न्यूज — सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित.