“गांधेलीमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष! शरद पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात शेकडो युवकांचा जाहीर प्रवेश”
महाराष्ट्र वाणी
गांधेली, ता. औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर :
गांधेली छत्रपती संभाजीनगर दि ८ :- आडगाव (बु) जि.प. गट आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांचा कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर प्रवेश सोहळा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे संघटनेला नवचैतन्य लाभल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या मेळाव्यात विविध संघटनांमधील शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये विश्वासपूर्वक प्रवेश केला. ग्रामीण भागातील युवकांचा वाढता कल पाहता पक्ष विस्ताराला नवी उभारी मिळाल्याचे नेतृत्वाने सांगितले.
कार्यक्रमाला माजी आमदार संजय वाघचौरे, प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंभीरे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोदीन , रज्जाक पठाण, विश्वजित चव्हाण आणि युवक शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी नव्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून पुढील काळात संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.
या भव्य मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) चे युवक जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे यांनी केले होते. नियोजनबद्ध आणि उत्साहाने भरलेला कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.